The Taste Of India? Not Really!

by Ashutosh Pradhan (ap@vinzai.com), founder of Punarbharan Foundation

Over the past few decades, a large cooperative has been promoting milk & derivatives with a “taste of India” tagline. But this claim is not only untrue and overbearing, but also has been responsible for inappropriately twisting the food habits of a large population for over a generation. Aren’t those who are born and raised in India, but reject dairy, Indians too?

They were in court seeking to throttle the fact-based anti-dairy campaign by a website, labeling it as “vicious”. However, in reality, it is time to seek the court of law to intervene and restrict this institution from taking all Indians for granted and making utterly false claims.

The horrors of dairy unleashed by the so-called “White Revolution” are beginning to be called out by a large number of individuals and groups as much as the dark side of the “Green Revolution” was questioned a few decades ago. More and more people are now aware – even though a glorious picture has constantly been painted via expensive campaigns across various media outlets – that all is not well.

The whole world is accepting that going vegan is the way to go. But it seems that Indians will board this bus the last, as usual following the West. Instead of openly pondering the extreme violence in dairy and quitting it immediately, we will drag our feet and finally join in much too late. And then we will busy up claiming plant-based food was a way of life prescribed in all our ancient texts.

Evolution has been an endless, constant process. It did not stop with apes evolving into Homo sapiens. Women had no voting rights until as recently as the previous century. Slavery, the custom of satee, grotesque sacrifices – all these evils were overturned eventually. So will animal-exploitation become passé, someday soon.

The question here is: will we board the “ahimsa express” in good time? We so want to invoke the times of Lord Krishna but conveniently forget the basics. Did Krishna’s contemporary herdsmen artificially inseminate cows to make them lactate? Did they force repeated pregnancies on helpless animals? Did they sell away the male calves for veal? Were they the largest exporters of beef of their times? Did they inject hormones to their milch animals and did they use extraction pumps to forcibly draw the last drop of milk?

When the guardians of our traditions learn and accept that modern dairy cannot operate profitably without undertaking all of these horrific practices, and when they realise that the very existence of commercial dairy actually conflicts with a true understanding of our traditions, will they move forward and embrace a just food-system devoid of cruelty and violence?

Until then, let’s ready up to witness more such court fights and campaigning.

~~~~~~~~~~~~~~~~~

मागील अनेक वर्षे एक मोठी सहकारी संस्था ‘द टेस्ट ऑफ इंडिया’ अशी टॅगलाईन वापरून दुधाची जाहिरात करत आली आहे. पण हा दावा खरा नाही, उलट वास्तव लपवून लोकांच्या सवयी बदलण्यास जबाबदार ठरलेला अतिरेक आहे. भारतात जन्माला आलेले, भारतात राहणारे, आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य मानणारे लोक काय भारतीय नाहीत??


परवा दुधामागचे भयंकर सत्य उलगडणार्या एका वेबसाईट विरुद्ध कोर्टात जाऊन दाद मागणार्या या संस्थेला आख्खा भारत आपली जागीर समजायचा काय हक्क आहे असे कोर्टात जाऊनच विचारायची वेळ आली आहे.


जशी हरितक्रांतीची काळी बाजू काही दशकं लोटल्यावर तरी आता स्वीकारली जाऊ लागली, तसेच धवलक्रांतीचे रक्तरंजन निदान काही लोकांना तरी लक्षात येऊ लागलं आहे. 


सगळ्या जगाला समजतंय की going vegan is the way to go. आम्ही, नेहमीप्रमाणे, सगळ्यात शेवटी हे सत्य स्वीकार करू आणि सोबत गळे काढू की “आमच्याकडे हे ज्ञान आधीच होतं…” किंवा “आमच्या गीतेत, यजुर्वेदात असंच सांगितलंय…” वगैरे वगैरे. मग अहमहमिका लागेल वेद, पुराणं, शास्त्र आदिंचे दाखले देण्याची.


माकडाचा माणूस झाला, तिथे उत्क्रांती थांबली का? वैचारिक उत्क्रांती झाली म्हणून स्त्रियांना मतदानाचा हक्क आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान वाटा मिळाला; गुलामगिरी, सतीप्रथा, बळी देणे ई. अनिष्ट प्रथा थांबल्या. तसंच मुक्या प्राण्यांच्या कत्तली आणि छळ हे देखील नक्की थांबेल.


प्रश्न हा आहे की आम्ही इथेही पाश्चात्यांच्या नंतरच या गाडीत चढणार का? आणि रडत-फरपटत कसेतरी या गाडीत चढल्यावर नंतर स्वतःच्या संस्कृतीचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार का? 


आम्ही अजूनही कृष्णाच्या गोकुळातलं पवित्र दुध पितो अशा बालिश भ्रमात आहोत. कृष्णाच्या गोकुळात गायी बलात्कार करून गाभण करवल्या जात होत्या का? नर पाडसं मारून मांस निर्यात करत होते का? गायींना संप्रेरके (hormones) टोचून टोचून सकाळ-संध्याकाळ त्यांचं दूध मशीननी पिळून काढत होते का? भाकड गायी कत्तलखान्यात पाठवत होते का? कोवळी पाडसं त्यांच्या आईपासून ओढून विकत होते का? अशा भयंकर मार्गाने ओढून घेतलेल्या दुधाचे चीझ-पनीर-खवा-रबडी किलो-किलोंनी ओरपत होते का? संस्कृतीरक्षकांना ठाऊक तरी आहे का की आज भारतात दुधाचा धंदा या गोष्टी केल्याशिवाय नफ्याचा होत नाही?


एक दिवस आम्ही दुधामागची आधुनिक कृष्णकहाणी मान्य करून एक अहिंसक, १०० टक्के वनस्पतीजन्य अशी अन्नव्यवस्था उभी करू. त्याला पर्याय नाही. तोवर मात्र परवासारख्या कोर्टातील लढाया आणि जागोजागी प्राण्यांवरील अत्याचाराविरूद्ध उभ्या झालेल्या असंख्य चळवळी बघण्याची तयारी ठेवावी.